सरकारनामा ब्यूरो
देशात असे अनेक राजघराणे आहेत ज्यांची संपत्ती कोट्यावधीची आहे. अशाच एका राजघराण्यातील राजा यदुवीर वाडियार यांची एकूण संपत्ती किती आहे जाणून घेऊयात.
यदुवीर वाडियार हे म्हैसूरच्या वाडियार घराणांचे 27 वे राजा आहेत.
यदुवीर वाडियार यांनी अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून इंग्रजी आणि अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली आहे.
1399 पासून वाडियार राजघराण्याने म्हैसूरवर राज्य करण्यास सुरुवात केली होती तेव्हापासून तेथे राजा घोषित करण्यात आला. 1974 ला त्याचे काका श्रीकांतदत्ता नरसिम्हाराजा वाडियार यांनी राजगादीवर बसवण्यात आले होते.
श्रीकांतदत्ता नरसिम्हाराजा वाडियार यांच्या मृत्युनंतर 2013 ला यदुवीर वाडियार यांना राजा म्हणून घोषित करण्यात आले तेव्हापासून त्यांना कृष्णदत्ता चामराजा वाडियार या नावाने ओळखले जाऊ लागले.
द पॅलेस म्हैसूरचे राजा यदुवीर वाडियार यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावावर एकूण 4.99 कोटी रुपयांची संपत्ती
त्यांच्या पत्नीच्या नावे एकूण संपत्ती 1 कोटी 2 लाख 25 हजार रुपये आणि 1 कोटी 2 लाख 50 हजार किंमतीचे सोने चांदीचे दागिने, तर कुटुंबाच्या नावावर 3 कोटी 63 लाख 55 हजार 343 रुपये इतकी एकूण संपत्ती असून 24 लाख 50 हजार किंमतीचे सोने-चांदीचे दागिने आहेत.
त्यांच्या मालमत्तेत 3 लाख 39 हजार इतक्या किंमतीचे सोने चांदीचे दागिने असून त्यांची नावावर 1 कोटी 36 लाख 04 हजार 303 रुपये रक्कमेच्या ठेवी आणि 1 लाख रोख रक्कमेचा समावेश आहे.