Pradeep Pendhare
दूरसंचार कंपन्यांना आता केवळ व्हॉइस कॉल आणि SMS वापरणाऱ्या ग्राहकांसाठी विशेष टॅरिफ व्हाउचर (STV) उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.
ज्यांना मोबाइलवर इंटरनेट डेटा लागत नाही, अशा ग्राहकांना डेटा असलेल्या महागड्या पॅकमध्ये रिचार्ज करण्याची गरज कमी होईल.
30 दिवसांपर्यंतच्या विविध वैधता कालावधीसाठी कंपन्यांना व्हॉइस-SMS आधारित स्वतंत्र योजना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. ग्राहकांना गरजेनुसार रिचार्ज निवडता येणार.
कंपन्यांना अशी मासिक वैधतेची योजना द्यावी लागणार आहे, ज्यात ग्राहक दर महिन्याला एकाच तारखेला रिचार्जचे नूतनीकरण करू शकतील.
कंपन्यांना अल्प मुदतीच्या आणि मासिक योजनांव्यतिरिक्त अधिक कालावधीची किमान एक व्हॉइस-SMS योजना उपलब्ध करून द्यावी लागणार आहे.
ट्रायच्या निर्देशांनुसार या व्हॉइस-SMS योजनांच्या किमतीतही योग्य प्रमाणात कपात करणे कंपन्यांना बंधनकारक आहे.
2024 मधील ग्राहक संरक्षण नियमांनंतर बाजारात केवळ व्हॉइस आणि SMSसाठीच्या योजनांची उपलब्धता मर्यादित असल्याचे ट्रायच्या निदर्शनास आले.
जर ग्राहकाला फक्त कॉल आणि SMSची गरज असेल, तर त्याला अनावश्यक डेटा सुविधेसाठी पैसे मोजण्याऐवजी स्वतंत्र योजना निवडता येईल.
नव्या नियमांमुळे ग्राहकांना त्यांच्या वापराची गरज आणि आर्थिक क्षमतेनुसार व्हॉइस-SMS रिचार्ज निवडण्याचे अधिक पर्याय मिळणार आहेत.
ट्रायच्या नव्या निर्देशांमुळे मोबाइल ग्राहकांना अधिक स्वस्त आणि लवचिक रिचार्ज पर्याय मिळण्याची शक्यता आहे.