Rashmi Mane
130 वर्षांपूर्वीचं डोगरा राजांचं स्वप्न आज वंदे भारत एक्सप्रेसच्या माध्यमातून साकार होत आहे. काश्मीरसाठी एक नवीन पर्व सुरू होणार आहे. शिवालिक आणि पीर पंजाल पर्वतरांगांतून काश्मीर घाटीपर्यंत जाणारी वंदे भारत ट्रेन.
पंतप्रधान नरेंद्र मोदी कटऱ्याहून काश्मीरपर्यंत या ऐतिहासिक प्रवासाला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. 19व्या शतकात महाराजा प्रताप सिंह यांनी या रेल्वे प्रकल्पाची कल्पना मांडली होती. ब्रिटिश अभियंत्यांना काश्मीरपर्यंत रेल्वे नेण्यासाठी सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते.
1898 ते 1909 दरम्यान तीन अहवाल तयार करण्यात आले. सुरुवातीचे दोन प्रस्ताव नाकारले गेले, तर तिसऱ्या प्रस्तावात चिनाब नदीच्या किनाऱ्याने रेल्वे मार्गाचे सुचवण्यात आले.
ब्रिटिश अभियंते आणि स्थानिक परिस्थितीच्या अडचणींमुळे आणि महाराजा प्रताप सिंह यांच्या निधनामुळे प्रकल्प 1925 मध्ये थांबवण्यात आला.
1983 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जम्मू-उधमपूर-श्रीनगर रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी केली. मात्र 13 वर्षांत फक्त 11 किमीच काम पूर्ण होऊ शकले.
एच. डी. देवेगौडा आणि आय. के. गुजराल यांनी अनुक्रमे उधमपूर, काजीगुंड आणि बारामुला येथे प्रकल्पाचा पाया घातला. सुरुवातीचा खर्च 2,500 कोटी होता, जो आता 43,800 कोटींवर पोहोचला.
प्रकल्पाचे सामरिक महत्त्व लक्षात घेऊन 2002 मध्ये ‘राष्ट्रीय प्रकल्प’ घोषित करण्यात आले. मोदी सरकारच्या काळात कामाला वेग आला.
एकूण 272 किमी लांबीच्या या मार्गात 38 भुयारे आणि 927 पूल आहेत. या प्रकल्पाने काश्मीरचा भारताशी असलेला दळणवळण दुवा अधिक बळकट केला.