Ganesh Sonawane
राज्य सरकारने त्र्यंबकेश्वरला पर्यटनाचा ‘अ’ वर्गाचा दर्जा दिला आहे. यामुळे धार्मिक पर्यटनासोबतच स्थानिक पर्यटनालाही चालना मिळेल.
या दर्जामुळे केंद्र व राज्य सरकारकडून मोठा निधी मिळेल. विकासकामे अधिक वेगाने पूर्ण होऊ शकतील.
2027 च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष सुविधा मिळतील. यात्रेकरूंसाठी स्वच्छता, रस्ते, निवासाची व्यवस्था बळकट होईल.
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भाविकांची व पर्यटकांची संख्या वाढेल . यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ व पर्यटनाला चालना मिळेल.
हरिहरगड, अंजनेरी, ब्रह्मगिरीसारख्या ठिकाणी पर्यटक वाढतील. निसर्गाच्या जतनासोबत ट्रेकिंग, ईको-टुरिझम वाढेल.
पुरातन मंदिरे व कुंडांचे जतन-संवर्धन करता येईल. सांस्कृतिक वारशाला नवे रूप मिळेल.
हॉटेल, वाहतूक, गाइड सेवा यामध्ये रोजगार संधी निर्माण होतील. स्थानिक तरुणांना फायदा होईल.
वॉटर सप्लाय, रस्ते, आरोग्य सुविधा यात वाढ होईल. पर्यटनाच्या माध्यमातून शहराचा सर्वांगीण विकास घडेल.