Ripun Bora : तुमचा पक्ष प्रादेशिकच; राजीनामा देत ममतांना थेट सांगण्याची हिंमत दाखवणारे रिपून बोरा कोण?

Rajanand More

रिपून बोरा

रिपून बोरा हे आसाम तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांनी पदासह पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

Ripun Bora | Sarkarnama

दोन वर्षांपूर्वी दाखल

रिपून यांनी दोन वर्षांपूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांच्याकडे लगेच प्रदेशाध्यक्ष पद सोपवण्यात आले होते.

Ripun Bora | Sarkarnama

मुळचे काँग्रेसचे

काँगेसमधून बाहेर पडत टीएमसीमध्ये केला होता प्रवेश. आसाम काँग्रेसमधील मातब्बर नेते म्हणून होती ओळख.

Ripun Bora | Sarkarnama

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष

आसाम काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केले. राज्यात काँग्रेस सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री तसेच राज्यसभेचे खासदारही होते.

Ripun Bora | Sarkarnama

प्रादेशिक पक्ष

राजीनामा देताना अभिषेक बॅनर्जी यांना पाठवलेल्या पत्रात टीएमसी हा पश्चिम बंगालपुरता प्रादेशिक पक्ष असल्याची लोकांची भावना झाल्याचे म्हटले आहे.

Ripun Bora | Sarkarnama

शिफारशींचा विचार नाही

पक्षवाढीसाठी काही महत्वाच्या शिफारशी पक्षनेतृत्वाकडे केल्या. पण त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही, असाही रिपून यांचा दावा.

Ripun Bora | Sarkarnama

ममतांसाठी धक्का

रिपून यांचा राजीनामा ममता बॅनर्जी यांच्यासाठी धक्का आहे. त्यांच्या पक्षविस्ताराच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे.

Ripun Bora | Sarkarnama

घरवापसी

रिपून हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास राज्यात कोमजू लागलेल्या काँग्रेसची ताकद वाढणार आहे.

Ripun Bora | Sarkarnama

NEXT : मतदार नोंदणीत पुणे जिल्हा आघाडीवर; 'या' जिल्ह्यात सर्वात कमी मतदार

येथे क्लिक करा.