सरकारनामा ब्यूरो
म्हैसूरच्या वाडियार राजघराणे हे भारतातील सर्वात श्रीमंत राजघराण्यांपेकी एक आहे.
राजस्थानच्या डूंगरपुर येथील राजघराण्यातील त्रिशिका कुमारी यांचे वाडियार घराण्याचे 27 वे राजा यदुवीर वाडियार यांच्याशी 2016 मध्ये विवाह झाला.
2024 मध्ये त्रिशिका यांनी मुलाला जन्म दिला असून त्यांचे नाव युगाध्यक्ष कृष्णराज वाडियार असे ठेवण्यात आले आहे.
वडियार घराण्याला श्राप मिळाला होता की, 400 वर्षा पासून वडियार घरण्यात मुलांना दत्तक घेतले जाते आणि तोच मुलगा पुढे राजगादी चालवेन.पण त्रिशिका यांनी मुलाला जन्म देऊन वडियार घराण्याला मिळालेला श्राप मोडला आहे.
त्रिशिका यांच्या वडिलांचे नाव हर्षवर्धन सिंह आणि आईचे नाव महेश्री कुमारी आहे. त्यांनी बंगळुरूमधील बाल्डविन स्कूल आणि ज्योती निवास कॉलेजमधून शिक्षण घेतले आहे.
वाडियार घराण्याची एकूण संपत्ती 80 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त असून त्यांची एकूण संपत्ती 1 कोटी 2 लाख 25 हजार रुपये आणि 1 कोटी 2 लाख 50 हजार किंमतीचे दागिने आहेत.
कुटुंबाच्या नावावर 3 कोटी 63 लाख 55 हजार 343 रुपये इतकी एकूण संपत्ती असून 24 लाख 50 हजार किंमतीचे सोने-चांदीचे दागिने आहेत.