Deepak Kulkarni
यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून नागरी सेवेत जाणं हे अनेकांचं ध्येय असतं. याचवेळी न्यायालयीन सेवेत सामील होणं,यासाठीही अनेकजण कठोर मेहनत घेत असतात.
भारतीय न्यायव्यवस्था ही जगातील सर्वात मोठी आणि तितकीच शक्तिशाली न्यायव्यवस्था समजली जाते.
याच न्यायव्यवस्थेला लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. याच न्यायव्यवस्थेत न्यायाधीशांवर कोणावरही अन्याय न करता न्याय करण्याची मोठी जबाबदारी असते.
याचदरम्यान, एक अत्यंत प्रेरणादायी आणि कौतुकास्पद माहिती समोर येत आहे. हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील एका ट्रकचालकाच्या मुलीनं उत्तुंग भरारी घेतली आहे.
बसदेहरा येथे वास्तव्याला असणारे ट्रक ड्रायव्हर अमरिक सिंग यांची मुलगी सिमरनजीत कौरने न्यायालयीन सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
सिमरनजीतने न्यायाधीश बनून आपल्या कुटुंबाचं नाव अभिमानानं उंचावलं आहे.तिचे प्राथमिक शिक्षण मेहतपूरच्या डीएव्ही पब्लिक स्कूलमधून तर एलएलबी, एलएलएम हे पंजाब विद्यापीठातून पूर्ण केले.
सिमरजीतनं तिच्या यशाचं श्रेय हे तिच्या वडिलांना दिले. ज्यांनी न्यायाधीश होण्यापर्यंतच्या आत्तापर्यंतच्या प्रवासात कायमच तिच्यासोबत राहिले. ट्रक ड्रायव्हर असूनही, त्यांनी तिच्या शिक्षणासाठी कायमच पाठबळ दिलं.
अतिशय शिस्तबध्द अभ्यासाला प्राधान्य दिल्यामुळे ती न्यायाधीशपदापर्यंत पोहोचू शकली. हिमाचल सरकारच्या न्यायिक सेवेत हजारो विद्यार्थ्यांनी परीक्षेत भाग घेतला होता. पण फक्त 20 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यात मुलींची संख्या जास्त आहे.
सिमरनजीत दिवसातल्या 15 तासांपेक्षा अधिकवेळा अभ्यास करत असे. न्यायिक सेवेची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तिच्या संपूर्ण एकत्रित कुटुंबाची अवस्था आनंद गगनात मावेना अशीच झाली आहे.