Aslam Shanedivan
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू असाताना भारताने रशियाकडून तेल खरेदी केले होते. ते अद्यापही घेतले जात आहे.
भारत रशियात सुरू असणारा हा व्यापार अमेरिकेच्या पचणी पडलेला नाही. यामुळे मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आक्रमक आहेत.
याच मुद्दयावरून ट्रम्प यांनी भारताला सतत इशारा देताना टीका केली होती. तसेच मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी आयातशुल्क लावण्याचा इशारा दिला होता.
त्या प्रमाणे त्यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लादण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता 24 तासांत भारतावर 25 टक्के अतिरिक्त टॅरिफ लादण्याची घोषणा ट्रम्प यांनी केलीय. त्यामुळे भारताला आयातशुल्क 50 टक्के मोजावे लागणार आहे.
यावरून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी, भारताची भूमिका मांडली असून 'हे खूप दुर्दैवी असल्याचे म्हटंल आहे.
याआधीच आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली असून आमची तेल आयात बाजारावर आधारित आहे. ज्याचा मुख्य उद्देश 140 कोटी भारतीयांना निश्चित आणि सुरळीत ऊर्जा पुरवठा करणे आहे.
अमेरिकेनं उचलेलं भारताबाबतचे पाऊल अन्यायकारक, चुकीचे आणि अविवेकी आहे. पण आम्ही राष्ट्रहिताचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना करू.