Jagdish Patil
अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, PM मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते आहेत.
या 4 पॉवरफूल नेत्यांच्या वय आणि खाजगी आयुष्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
सर्वात आधी व्लादिमीर पुतिन यांच्याबाबतची माहिती जाणून घेऊ, पुतिन यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1952 रोजी लेनिनग्राड येथे झाला.
73 वर्षीय पुतीन 1999 साली पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले. विलासी जीवन जगणारे पुतिन वैयक्तिक आयुष्य खूप खाजगी ठेवतात.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म 14 जून 1946 रोजी झाला. 79 वर्षीय ट्रम्प यांनी 3 लग्न केली आहेत.
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांचा जन्म 15 जून 1953 रोजी झाला. ते 72 वर्षांचे असून त्यांच्या पत्नीचे नाव पेंग लियुयान आहे. पेंग या चीनची लोकगीत गायिका आहे.
74 वर्षीय PM नरेंद्र मोदी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील वडनगर गावातील मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
मोदी यांनी 26 मे 2014 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान आहेत.
मोदींचा पंतप्रधान म्हणून हा तिसरा कार्यकाळ आहे. जुलैमध्येच त्यांनी इंदिरा गांधींचा 4,077 दिवस सतत पंतप्रधान राहण्याचा विक्रमही मोडला आहे.