Tukaram Mundhe : IAS तुकाराम मुंढेंनी तरुणाईला दिले जीवन बदलणारे आठ सल्ले, यश नक्की मिळणार!

Roshan More

तरुणाईशी संवाद

IAS तुकाराम मुंढे यांनी अमरावतीमधील स्वामी विवेकानंद सभागृहात तरुणाईशी संवाद साधला. त्यामध्ये त्यांना आयुष्य बदलणाऱ्या टिप्स दिल्या.

IAS officer Tukaram Mundhe interacts with students and shares eight inspiring life lessons aimed at motivating the younger generation. | sarkarnama

एका सेकंदात दृष्टिकोन बदलतो

जे मला तुकाराम म्हणत ते यूपीएससीचा निकाल लागताच अवघ्या एका सेकंदात मला सर म्हणून लागले. समाजाचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एका सेकंदात बदलतो समाजाचा दृष्टिकोन बदलतो.

IAS officer Tukaram Mundhe Journey

यशाचे श्रेय मेहनतीला

तुमच्या प्रवासाने किंवा विचारांनी कोणी प्रेरित झाले, तरी त्याचे खरे श्रेय त्या व्यक्तीच्या मेहनतीलाच जाते. मार्गदर्शक फक्त दिशा दाखवतो, पण यशाची शिखरे स्वतःच्या कष्टानेच गाठायची असतात.

IAS officer Tukaram Mundhe Journey

बदलांमध्ये वाहत जाऊ नका

आयुष्यात अनेक चढ-उतार येतात, पण परिस्थितीसमोर आत्मसमर्पण करून वाहत जाणे हा सर्वात मोठा धोका आहे.कठीण काळात डगमगून न जाता धैर्याने आणि ठामपणे परिस्थितीचा सामना करा.

IAS officer Tukaram Mundhe Journey

तंत्रज्ञानाच्या क्रांतीत घाबरू नका

प्रत्येक औद्योगिक क्रांतीच्या वेळी नोकऱ्या जातील अशी भीती नेहमीच व्यक्त केली गेली आहे.इतिहासाने दाखवून दिले आहे की नोकऱ्या संपत नाहीत, तर काम करण्याचे स्वरूप आणि पद्धत बदलते.

IAS officer Tukaram Mundhe Journey

बुद्धिमत्तेपेक्षा 'विवेक' महत्त्वाचा

आजच्या एआय आणि मशीन लर्निंगच्या युगात केवळ माहिती किंवा बुद्धिमत्ता असणे पुरेसे नाही.बुद्धिमत्तेपेक्षा तुमच्याकडे योग्य-अयोग्य समजण्याचा 'विवेक' आहे का, हा खरा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे.

माहिती आणि ज्ञान

पूर्वी माहिती मिळवण्यासाठी ग्रंथालयात जाऊन मेहनत करावी लागायची, आज सर्व माहिती मोबाईलमध्ये उपलब्ध आहे.मात्र, मोबाईलमधील माहिती म्हणजे ज्ञान नव्हे; माहितीचा योग्य वापर करण्याची क्षमता म्हणजेच ज्ञान.

IAS officer Tukaram Mundhe Journey

विवेकाची पोकळी...

आज जगातील सर्व माहिती खिशात असलेल्या स्मार्टफोनमध्ये सहज उपलब्ध आहे.पण या डिजिटल युगात 'विवेकाची पोकळी' निर्माण झाली असून, तरुणांनी विवेकी विचार आत्मसात करणे गरजेचे आहे.

IAS officer Tukaram Mundhe interacts with students and shares eight inspiring life lessons aimed at motivating the younger generation. | sarkarnama

काळासोबत स्वतःला अपडेट करा

नवीन युगात टिकून राहण्यासाठी फक्त माहिती गोळा करण्यामागे धावू नका.मोबाईलमधील तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून स्वतःचा बुद्ध्यांक आणि वैचारिक विवेक समृद्ध करा.

IAS officer Tukaram Mundhe interacts with students and shares eight inspiring life lessons aimed at motivating the younger generation. | sarkarnama

IPS News : 'Gen Z' चा मराठमोळा IPS अधिकारी देशभर चर्चेत

येथे क्लिक करा