Tukaram Munde : ...म्हणून तुकाराम मुंढेंची वारंवार होते बदली? 19 वर्षांत 21 वेळा ट्रान्सफर

Jagdish Patil

पुन्हा बदली

आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली. ही त्यांच्या 19 वर्षांच्या कारकीर्दितील 21 वी बदली आहे.

Tukaram Munde | Sarkarnama

सचिवपद

पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून त्यांची बदली करण्यात आली आहे.

Tukaram Munde | Sarkarnama

मागील वर्षी नियुक्ती

मागील वर्षी जुलै महिन्यात त्यांची पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली होती.

Tukaram Munde | Sarkarnama

विकास आयुक्त, असंघटित कामगार

आता विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उपजिल्हाधिकारी

2007 सालापर्यंत ते सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. येथूनच त्यांनी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली.

Tukaram Munde | Sarkarnama

शिस्तप्रिय अधिकारी

मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी आहे. ते जिथे जातात तिथे त्यांचा दबदबा निर्माण करतात. नवी मुंबईसह नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांनी कामकाज पाहिलं आहे.

Tukaram Munde | Sarkarnama

वारंवार वाद-मतभेद

मात्र त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे त्यांचे स्थानिक प्रशासनासोबत वारंवार वाद-मतभेद होतात. हे एक त्यांच्या सतत बदली होण्यामागचं कारण मानलं जातं.

Tukaram Munde | Sarkarnama

NEXT : लोकसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या नेहरू-गांधी कुटुंबातील प्रियांका 10 व्या सदस्य

priyanka | Sarkarnama
क्लिक करा