तुकाराम मुंढेंची सोशल मीडियावर हवा, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे पाटीलही मागे

Roshan More

सोशल मीडियावर मुंढेंचा जलवा

IAS तुकाराम मुंढे यांची सोशल मीडियावर हवा आहे. लोकप्रियतेत त्यांनी राजकीय नेत्यांना मागे टाकले आहे.

Tukaram Mundhe

राजकीय नेते मागे

इन्स्टाग्रामवर फाॅलोअर्समध्ये तुकाराम मुंढे हे राजकीय नेत्यांपेक्षा पुढे आहेत. त्यांचे तब्बल 34 लाख फॉलोअर्स आहेत.

Tukaram Mundhe

फडणवीस, शिंदे मागे

इन्स्टाग्रामवर तुकाराम मुंढे यांचे ३४ लाख १५ हजार फॉलोअर्स आहेत. CM फडणवीसांचे २९ लाख २ हजार, तर एकनाथ शिंदेंच १३ लाख १ हजार फॉलोअर्स आहेत.

Tukaram Mundhe | Sarkarnama

एंगेजमेंट रेटमध्येही पुढे

इन्स्टाग्रामवरील एंगेजमेंट रेटमध्ये तुकाराम मुंढे पुढे असून त्यांनी CM देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागे टाकले आहे.

Tukaram-Mundhe- | Sarkarnama

पोस्ट कमी प्रतिसाद जास्त

तुकाराम मुंढेंच्या सोशल मीडियावर पोस्ट कमी आहेत. मात्र, त्यांच्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळतोय. गेल्या दोन महिन्यात त्यांनी इन्स्टावर अवघ्या १३ पोस्ट केल्या आहेत.

Tukaram Mundhe | sarkarnama

अधिकारीही मागे

लोकप्रिय अधिकाऱ्यांमध्ये देखील तुकाराम मुढेंची याची सोशल मीडियावर सरशी आहे. इन्स्टाग्रामवर त्यांना ३४.१५ लाख फॉलोअर्स आहेत. तर, समीर वानखेडेंना ८.४७ लाख, तर IPS विश्वास नांगरे पाटील यांचे ६.१२ लाख फॉलोअर्स आहेत.

ट्विटर

'एक्स’(पूर्वीचे ट्विटर) वर तुकाराम मुंढे यांचे २.६५ लाख फॉलोअर्स आहेत. राजकीय नेत्यांच्या तुलनेत ते कमी आहेत मात्र एंगेजमेंट रेटमध्ये मुंढे आघाडीवर आहेत.

NEXT : कर्मचाऱ्यांसोबत महिला जिल्हाधिकाऱ्यांचे नृत्य; सोशल मीडियात व्हायरल

IAS Anu Kumari | Sarkarnama
येथे क्लिक करा