Mangesh Mahale
भिंती आणि फ्लोअर या टाईल्सच्या असाव्यात. त्या टाईल्स वॉशेबल असाव्यात. त्यातून पाणी झिरपू नये.
किचनमध्ये पुरेशी हवा खेळती हवी. तसेच किचनला एक्झॉस्ट असावा.
स्वयंपाक तयार करण्यासाठी वेगळा सेक्शन असावे. कच्चे, शिजवलेले अन्न वेगळे असावे.
किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अन्न वेगवेगळे ठेवले पाहिजेत. इलेक्ट्रॉनिक फ्लाय ट्रॅप बसवावेत.
किचनमध्ये पेस्ट कंट्रोल नियमित केले पाहिजे. किडे, झुरळ, पाल, उंदरांचा प्रादुर्भाव नसावा.
ग्राहकांसाठी पाणी, हँडवॉश, साबण, टॉवेल ठेवण्यात यावेत.
ग्राहकांना चांगले पाणी मोफत उपलब्ध करून देणं बंधनकारक असेल