Ganesh Sonawane
भेसळयुक्त दूधाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनीही सतर्क राहणे गरजेचे आहे. तुमचे दूध Pure आहे की भेसळयुक्त, याचा प्राथमिक अंदाज घरच्या घरी घेता येतो.
लाकूड, काच किंवा फरशीच्या गुळगुळीत पृष्ठभागावर ही चाचणी करता येते. त्यावर दुधाचा एक थेंब टाका.
तो पृष्ठभाग थोडासा तिरपा करा. थेंब खाली सरकताना त्याचा वेग आणि मागे राहणारी खूण बारकाईने पाहा.
नैसर्गिक दूध हळूहळू खाली सरकते आणि पांढरी रेषा/डाग मागे सोडते.
भेसळयुक्त दूध पटकन खाली वाहून जाते आणि डाग सोडत नाही.
ही पद्धत दूध भेसळयुक्त आहे की नाही, याचा प्राथमिक अंदाज घेण्यासाठी आहे.
यातून दूध सर्व प्रकारच्या भेसळीपासून मुक्त आहे, असा अंतिम निष्कर्ष काढू नका.
घरगुती चाचणी ही केवळ प्राथमिक तपासणी आहे; संशय असल्यास अधिकृत प्रयोगशाळेतील तपासणी अधिक विश्वासार्ह आहे.
भेसळयुक्त दूधाचा संशय असल्यास महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन (FDA) कडे तक्रार करणे योग्य आहे. FDA महाराष्ट्र अन्नपदार्थांची तपासणी, नमुने घेणे आणि भेसळीविरोधात कारवाई करते.