Tuljapur Temple VIP Pass: तुळजापूर संस्थानचा नवरात्रौत्सव काळातच देवीभाविकांना धक्का; व्हीआयपी दर्शन पास महागणार

Deepak Kulkarni

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ म्हणून ओळख असलेल्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी राज्य आणि देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात.

Tulja Bhavani Temple | Sarkarnama

मंदिर प्रशासनाची तारेवरची कसरत

मंदिर प्रशासनाला ऐनवेळी भाविकांच्या गर्दीचे नियोजन करताना तारेवरची कसरत करावी लागते. 

Tulja Bhavani Temple | Sarkarnama

दर्शन सुविधा

तुळजापूर मंदिर समितीकडून दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी मंदिर समितीकडून देणगी दर्शन सुविधा मागील अनेक वर्षांपासून अंमलात आणली आहे. 

Tulja Bhavani Temple | Sarkarnama

व्हीआयपी दर्शन पासची सुविधा

ज्यांना रांगेत दर्शन घेणं शक्य नाही,त्यांच्यासाठी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी 200 रुपयांच्या व्हीआयपी दर्शन पासची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. 

Tulja Bhavani Temple | Sarkarnama

व्हीआयपी दर्शन सुविधा महागणार

पण आता ही व्हीआयपी दर्शन सुविधा महागणार आहे. नवरात्रौत्सवात काळातच संस्थानकडून याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे.

Tulja Bhavani Temple | Sarkarnama

दोनशेवरुन तीनशे रुपये

व्हीआयपी दर्शन पास आता दोनशेवरुन तीनशे रुपयांना मिळणार आहे.

Tulja Bhavani Temple | Sarkarnama

मंदिर प्रशासनाचा निर्णय

काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शनाची सुविधा बंद करण्यात आली होती. मंदिर प्रशासनाने बनावट व्हीआयपी दर्शनाला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेतला होता.

Tulja Bhavani Temple | Sarkarnama

 मोबाईल अ‍ॅपवरूनही पास काढता येणार

राज्य आणि देशभरातील भाविकांना मोबाईल अ‍ॅपवरूनही पास काढून घेता येणार आहे.

Tulja Bhavani Temple | Sarkarnama

देणगी दर्शन सुविधा अनेक वर्षांपासून

मंदिर समितीकडून देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी व्हीआयपी दर्शन पास सुविधा मागील अनेक वर्षांपासून अंमलात आणली आहे. पण याचवेळी धर्मदर्शन, मुखदर्शन, कलशदर्शन करण्याकरिता भाविकांना कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही.

Tulja Bhavani Temple | Sarkarnama

NEXT: काय सांगता? पर्यटकांचं फेवरेट ठिकाण असलेल्या 'या' राज्यात अद्यापही रेल्वे पोहोचलेली नाही

येथे क्लिक करा...