Tutari's Worship In Pandharpur : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी विठुराया चरणी अर्पण...

Vijaykumar Dudhale

तुतारीचे अनावरण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाकडून तुतारी हे चिन्ह मिळाले आहे. रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ तुतारीचे शनिवारी (ता. 24 फेब्रुवारी) अनावरण करण्यात आले.

Rohit Pawar | Sarkarnama

तुतारी विठुराया आणि रुक्मिणी चरणी अर्पण

आमदार रोहित पवार यांनी रविवारी (ता. 25 फेब्रुवारी) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार’ या पक्षाला मिळालेलं तुतारी हे चिन्ह अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठुरायाचरणी अर्पण केले.

Rohit Pawar | Sarkarnama

नामदेव पायरीजवळ पूजन

आमदार रोहित पवार यांच्या हस्ते विठ्ठल मंदिरासमोरील संत नामदेव पायरीजवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या तुतारी चिन्हाचे पूजन करण्यात आले.

Rohit Pawar | Sarkarnama

विठुराया सरकारला सद्‌बुद्धी दे

राज्यातील जातीयवाद, धर्मवाद आणि भेदभावाचं राजकारण दूर करून कष्टकरी, शेतकरी, युवा या सर्वच वर्गाच्या अडचणी सोडवण्याची ताकद दे आणि सामान्य लोकांच्या प्रश्नावरुन भरकटलेल्या सरकारला सद्बुद्धी मिळू दे, अशी प्रार्थना रोहित पवार यांनी विठुराया चरणी केली.

Rohit Pawar | Sarkarnama

देवेंद्र फडणवीसांवर टीका

देवेंद्र फडणवीस 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यातील सामाजिक एकता, समता नष्ट झाली आहे. गेल्या काही वर्षांपासून जातीयवाद, धर्मवाद मोठ्या प्रमाणावर वाढला आहे, असा आरोप या वेळी आमदार रोहित पवार यांनी केला.

Rohit Pawar | Sarkarnama

अरणमध्ये भक्तनिवास

संत शिरोमणी श्री सावता महाराज यांचं समाधीस्थळ असलेल्या श्री क्षेत्र अरण (ता. माढा. जि. सोलापूर) येथे ‘आमदार रोहितदादा पवार मित्र मंडळ’ आणि कर्जत-जामखेडमधील नागरिकांच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या भक्तनिवासाचे भूमिपूजन करण्यात आले.

Rohit Pawar | Sarkarnama

भक्त निवासाचे भूमिपूजन

संत श्री सावता महाराज यांचे वंशज हभप श्री रमेश महाराज वसेकर आणि राज्यभरातील भगिनींच्या हस्ते या भक्त निवासाचे भूमिपूजन करण्यात आले आहे.

Rohit Pawar | Sarkarnama

ही तर भाग्याची गोष्ट

‘कर्म हीच भक्ती’असा संदेश देणाऱ्या संत शिरोमणी श्री सावता महाराज यांच्या भक्तांची सेवा करण्याची संधी माझ्या मतदारसंघाला मिळणं, ही लोकप्रतिनिधी म्हणून भाग्याची गोष्ट आहे, अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली.

Rohit Pawar | Sarkarnama

उद्धव ठाकरेंचे कट्टर समर्थक अन् शिवसेनेचे निष्ठावंत शिलेदार !

Kailas Patil | Sarkarnama