Deepak Kulkarni
टॉलिवूड गाजवल्यानंतर सिनेअभिनेते विजय यांनी राजकारणात एन्ट्री घेतानाच 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) या पक्षाची स्थापना केली होती.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालांमध्ये विजय यांच्या टीव्हीके पक्षानं एकूण 234 पैकी 106 जागांवर आघाडी घेतल्याचं समोर येत आहे. यामुळे ते सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे.
एकीकडे TVK चा दमदार विजयी जल्लोष सुरू असतानाच सिनेअभिनेत्री त्रिशा कृष्णन विजय यांच्या चेन्नईतील निवासस्थानी दाखल झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विजय आणि त्यांची पत्नी संगीता स्वर्णलिंगम हे लवकरच घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चा सुरू आहे. या उद्भवलेल्या कौटुंबिक परिस्थितीला त्रिशा कृष्णन जबाबदार असल्याचं बोललं जात आहे. .
विजय आणि त्रिशा ही दोन हंसांची जोडी काही दिवसांपूर्वीच चेन्नईतील एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र उपस्थित असल्याचं समोर आलं होतं.
अभिनेत्री त्रिशा कृष्णन कारमधून विजय यांच्या घरी पोहोचताना दिसत आहे. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्रिशा आणि विजय यांची लव्हस्टोरीच्या चर्चांना उधाण आलं आहे.
तमिळनाडू विधानसभा निवडणुकीकीच्या निकालात टीव्हीके दमदार कामगिरी करत मोठा विजय खेचून आणला आहे. खास बात म्हणजेच या निकालादिवशीच त्रिशा 43 वा वाढदिवस साजरा करत आहे.
विजय यांचं एका अभिनेत्रीशी अफेअर असल्याचा आरोप करत त्यांच्या पत्नी संगीता सोर्नालिंगम यांनी काही महिन्यांपूर्वीच 27 वर्षांचं वैवाहिक नातं संपवण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं. त्यांनी चेंगलपट्टू जिल्हा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे.
दक्षिणात्य सुपरस्टार विजय आणि अभिनेत्री त्रिशा कृष्णन हे तमिळ सिनेसृष्टीतील फेमस जोडी मानली जाते. त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे आजपर्यंत दिले आहेत. ते एकमेकांना डेट करत असल्याचं चर्चा आहे.
एकीकडे त्रिशा किंवा थलपती विजय या दोघांपैकी कोणीही नात्याबाबत भाष्य केलेलं नाही. त्रिशा विजयपेक्षा 9 वर्षांनी लहान असून ती आजतागायत अविवाहित आहे. तर विजय संगीता या जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.