Vijaykumar Dudhale
डॉ. अनिकेत देशमुख यांनी 2019 मध्ये सांगोल्यातून आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती
आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात अनिकेत देशमुख यांचा 786 मतांनी पराभव झाला होता.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर डॉ. अनिकेत देशमुख यांनी वैद्यकीय क्षेत्रात पूर्णवेळ प्रॅक्टीस करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, पुन्हा ते सांगोल्याचा राजकारणात सक्रीय झाले आहेत.
डॉ. अनिकेत देशमुख यांनी लोकसभा निवडणुकीतही माढा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीनंतर डॉ. अनिकेत देशमुख यांनी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय मागे घेतला.
लोकसभेनंतर डॉ. अनिकेत देशमुख यांनी आता सांगोल्यातून विधानसभेसाठी शड्डू ठोकला आहे.
सांगोल्यातून विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी डॉ. अनिकेत यांचे बंधू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेली आहे. त्यामुळे शेकापच्या उमेदवारीवरून दोन्ही भाऊ समोरासमोर येण्याची शक्यता आहे.
शेकापचे नेते जयंत पाटील हे विधानसभेसाठी कोणत्या भावाच्या पारड्यात उमेदवारी टाकतात, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.