Rashmi Mane
भारताच्या लोकशाहीची गाडी चालवणारा महत्त्वाचा टप्पे म्हणजे संसद सत्रे! चला जाणून घेऊया त्यांचे प्रकार आणि वैशिष्ट्ये.
भारतीय संसदेत राष्ट्रपती, लोकसभा (जनतेचे प्रतिनिधी) आणि राज्यसभा (राज्यांचे प्रतिनिधी) असतात.
संसद सत्र म्हणजे तो कालावधी ज्यात लोकसभा आणि राज्यसभा बैठका घेऊन कायदे, बजेट आणि राष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतात.
भारतामध्ये तीन नियमित सत्रे आणि गरजेनुसार एक विशेष सत्र घेतले जाते:
बजेट सत्र
पावसाळी (मान्सून) सत्र
हिवाळी सत्र
विशेष सत्र
कालावधी: फेब्रुवारी ते मे
वैशिष्ट्य: हे सर्वात लांब सत्र असते.
मुख्य कार्य: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणे, आर्थिक धोरणांवर चर्चा करणे.
दोन टप्प्यांत विभागलेले.
कालावधी: जुलै ते सप्टेंबर
मुख्य कार्य: जनहिताचे मुद्दे, नवे विधेयक, नीतिनियमांवर चर्चा.
पावसाळ्यानंतर सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यासही महत्त्वपूर्ण.
कालावधी: नोव्हेंबर ते डिसेंबर
वैशिष्ट्य: हे सर्वात छोटे सत्र असते.
मुख्य कार्य: विधेयके मंजूर करणे, सामाजिक व आर्थिक मुद्द्यांवर चर्चा करणे.
केव्हा बोलावले जाते: राष्ट्रपती, मंत्रिमंडळाच्या सल्ल्यावर.
उद्देश: राष्ट्रीय सुरक्षा, महत्त्वाचे विधेयक किंवा ऐतिहासिक निर्णय घेण्यासाठी.
हे नियमित वेळापत्रकात नसते.