Mayur Ratnaparkhe
प्रशांत किशोर यांच्या पक्ष जन सूरज पक्षाने पूर्णियाचे माजी खासदार उदय सिंह उर्फ पप्पू सिंह यांची पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली आहे
उदय सिंह यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याची घोषणा पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर यांनी सोमवारी (१९ मे) पाटणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
उदय सिंह हे पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून दोन वेळा भारतीय जनता पक्षाचे खासदार राहिले आहेत
२०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
उदय सिंह लोकसभा निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला.
उदय सिंह यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९५२ रोजी झाला, ते मूळचे बिहारचे रहिवासी आहेत.
उदय सिंह यांचे वडील टीपी सिंग (त्रिभुवन प्रसाद सिंग) हे आयसीएस अधिकारी होते
उदय सिंह यांच्या आई माधुरी सिंह देखील पूर्णिया येथून दोनदा खासदार राहिल्या आहेत.
आम्हाला आशा आहे आणि अपेक्षा आहे की तो केवळ जनसुराज पार्टीलाच नाही तर संपूर्ण बिहारलाही पुढे घेऊन जातील, असा विश्वास प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला.