Rashmi Mane
भारतात गुप्त माहिती शत्रू देशाला देणे म्हणजे "हेरगिरी" याची शिक्षा अत्यंत कठोर असते. जाणून घ्या कायद्याने यासाठी काय तरतूद केली आहे.
भारतात "Official Secrets Act, 1923" अंतर्गत जासूसी करणाऱ्यांवर खटला चालवला जातो. हा कायदा सरकारच्या गोपनीय माहितीचे संरक्षण करतो.
हरियाणातील युट्यूबर ज्योती मल्होत्राच्या अटकेमुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. हेरगिरीसाठी कोणती शिक्षा दिली जाऊ शकते आणि भारतीय कायदा याबद्दल काय म्हणतो ते जाणून घेऊया.
देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची असलेली लष्करी, गुप्तचर, संरक्षण यंत्रणा संबंधित माहिती ही गोपनीय समजली जाते.
जर एखाद्या व्यक्तीने देशाच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही माहिती (जसे की लष्करी योजना, शस्त्रे किंवा संरक्षण स्थाने) परदेशी एजंट किंवा शत्रू राष्ट्राला दिली तर त्याला 14 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. गंभीर प्रकरणांमध्ये, जन्मठेपेची शिक्षा देखील शक्य आहे.
कलम ४: परदेशी एजंटांशी अनधिकृत संपर्क साधल्यास 2 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते
कलम ५: गोपनीय माहिती लीक करणे किंवा ती शत्रूला देणे यासाठी 3 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.
कलम १०: काही प्रकरणांमध्ये, कमी गंभीर हेरगिरीच्या कारवायांसाठी 3 वर्षांपर्यंतची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो.
कलम 152 : या कलमात भारताच्या सार्वभौमत्वाला, एकतेला किंवा अखंडतेला धोका निर्माण करणाऱ्या कारवाया समाविष्ट आहेत. जर एखादी व्यक्ती देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यात किंवा लष्करी माहिती शेअर करण्यात सहभागी असेल तर त्याला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते.
यापूर्वी, हेरगिरीशी संबंधित गुन्ह्यांसाठी कलम 121 (देशाविरुद्ध युद्ध पुकारणे) आणि आयपीसीचे इतर कलमे लागू होते. या तरतुदी आता BNS Bharatiya Nyaya Sanhita मध्ये समाविष्ट केल्या आहेत.