Roshan More
खासदार उदयनराजे भोसले यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत उदयनराजे यांनी शहांकडे निवेदन देत 9 मागण्या केल्या. त्या पुढील प्रमाणे...
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांचा अवमान होईल असे भाष्य, टिपणी किंवा कृती करणाऱ्यांव कारवाईसाठी मकोका, टाडा सारखा अजामीनपात्र आणि 10 वर्षे सश्रम कारावासाची व जबर दंडाची शिक्षा असलेला विशेष कायदा पारित करावा.
राज्य व केंद्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि एकंदरीत मराठा साम्राज्याचा इतिहास अधिकृतपणे प्रसिध्द करावा
ऐतिहासिक घटनांचे चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेबसिरिज, डॉक्युमेंटरीज यांचे चित्रिकरणापूर्वी सेन्सॉर बोर्डाला सहाय्यभुत असलेली, इतिहासकार, संशोधक आणि इतिहासतज्ज्ञांचा समावेश असलेली कमिटी स्थापन करावी, कमिटीच्या शिफारशी विचारात घेवून सेन्सॉरशिप देण्यात यावी.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तुत्वाचा अतुलनीय वारसा आपल्याला लाभला आहे. सपूर्ण जगासाठी प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची प्रचिती देणारे राष्ट्रीय स्मारक नवी दिल्ली येथे उभारावे.
या स्मारकामध्ये राष्ट्रीय आणि आतर्राष्ट्रीय स्तरावरुन, संशोधन आणि संकलित केलेले छत्रपतींविषयी अप्रकाशित दस्तावेज, चित्रे, शस्त्रांस्त्रे, ऐतिहासिक नोंदी, चित्रे, कलाकृती, युध्दनिती, इत्यादींचा समावेश असावा.
छत्रपती शिवाजीमहाराज यांचे वडील, स्वराज्याचे संकल्पक, शहाजीराजे भोसले यांची समाधी कर्नाटक राज्यात आहे.शहाजीराजेंच्या असामान्य व्यक्तीमत्वाची समाधी व आजुबाजुचा परिसराचा विकास करण्यासाठी केंद्रशासनाने भरीव निधी उपलब्ध करुन द्यावा.
महाराष्ट्रातील किल्ले राजगड, किल्ले रायगड,किल्ले अजिंक्यतारा या तीन राजधानी किल्ले व परिसराचा विकास करावा, दुस-या टप्यात राजधानी जिंजी (कर्नाटक), पानीपत, आग्रा, इंदूर, ग्वालियर, तंजावर, यासह अन्य ठिकाणच्या विकासाचे धोरण आखावे.
मुंबई येथील अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक उभारणेची पायाभरणी झाली आहे. तथापि स्मारक लवकरात लवकर उभारावे.