Aslam Shanedivan
राज्यात महाविकास आघाडीतील कोणत्याच पक्षाचे 29 आमदार निवडून आलेले नसल्याने इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेतेपद रिक्त राहिलं आहे
याविषयावरून महायुती आणि महाविकास आघाडीत खडाजंगी झाली आहे. या पावसाळी अधिवेशनातही या मुद्दा तापला होता.
दरम्यान आज विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचाही कार्यकाळ संपला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळात जोरदार फटकेवाजी केली. तसेच निष्टावंत म्हणत मृणाल गोरे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मृणालताई गोरे या समाजवादी नेत्या होत्या. ज्यांनी सामान्य आणि महिलांच्या समस्यांबद्दल काम केलं होते.
त्या महाराष्ट्रात आमदार तसेच सहाव्या लोकसभेत खासदार होत्या. तर त्यांनी आपल्या सुरूवातीच्या काळात गोरेगाव ग्रामपंचायत, मुंबई महानगरपालिकेतही प्रतिनिधित्व केले
1980 च्या लोकसभा निवडणुकीत मृणालताईंचा पराभव झाला. त्यानंतर त्या राज्यात परतल्या आणि 1985 ते 1990 या कालावधीत मृणालताई विधानसभेत विरोधी पक्षनेत्या झाल्या
मृणालताई विधानसभेत विरोधी पक्षनेत्या असताना जनता पार्टीचे फक्त 20 आमदार होते