Akshay Sabale
शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील कटूता एका नव्या उंचीवर पोहोचली आहे.
एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन, असा इशारा ठाकरे यांनी फडणवीस यांना दिला आहे. शिवसैनिकांना बिनधास्तपणे अंगावर चालून जाण्याच आदेशही उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
अनिल देशमुखांनी सांगितलं, मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी फडणवीसांनी डाव रचले होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
लढाईला तोंड फुटताना शिवाजी महाराज व मावळे हर हर महादेव म्हणत शत्रूवर तुटून पडायचे. तसे आपल्यावर आपल्या शत्रूंवर तुटून पडायचे आहे, असा एल्गार उद्धव ठाकरे यांनी केला.
लोकसभेला आपण असे लढलो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही घाम फुटला. आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला याच, असं आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.
भाजप हा चोर व राजकीय षंढांचा पक्ष आहे. त्यांचे मनसुबे राज्याला भिकारी बनवणारे आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.