Roshan More
उद्धव ठाकरेंनी आपल्या शैलीत धाराशीवमधील सभेतून फुटलेले खासदार ओमराजे यांचा समाचार घेतला. तसे भाजप सरकारवर देखील टीका केली.
देशात जे काही राजकारण सुरू आहे, ते लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. ही केवळ पक्षांतर्गत बंडखोरी नसून, भाजपामध्ये अंतर्गत पातळीवर पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी सुरू असलेली फोडाफोडी आहे.
मी तुमची जाहीर क्षमा मागतो. मी चुकीचा माणूस तुमच्या पदरात टाकला. तुम्ही माझ्यावर आणि शिवसेनेवर भरोसा ठेवून त्याला निवडून दिलात, पण तो अखेर गद्दार निघाला.
ओमराजेंना उद्देशून ठाकरे म्हणाले, "तो गद्दार म्हणाला होता- माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये आहे, सभेला येऊ शकत नाही. पण नंतर जेव्हा व्हिडिओ समोर आले, तेव्हा सगळं सत्य उघड झालं.
मी त्याला फोनवर स्पष्ट सांगितलं होतं की, 'बघ, मला ओमराजे (माणूस) म्हणून तू सोबत पाहिजे आहेस, आणि तुला फक्त खासदारकी हवी असेल तर निर्णय तुझा आहे.' मला खासदारकीपेक्षा माणसं जपणं महत्त्वाचं वाटतं.
बाबरीचा लढा जेव्हा झाला, तेव्हा भाजपवाले आम्ही हे केलं नाही म्हणून हात झटकत होते. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जाहीरपणे म्हणाले होते, 'जर हे काम माझ्या शिवसैनिकांनी केलं असेल, तर मला त्यांचा सार्थ अभिमान आहे!'
जे भाजपवाले पूर्वी बेंबीच्या देठापासून 'मंदिर वही बनायेंगे' म्हणून ओरडत होते, त्यांच्याच काळात आता अयोध्येतील राम मंदिराची लूट सुरू असल्याच्या बातम्या येत आहेत.
"परभणी आणि धाराशीवच्या राजकारणात मला वाटायचं की माझ्या दोन्ही बाजूंना दोन वाघ उभे आहेत. पण मला काय माहीत, वाघाचं कातडं पांघरून माझ्या शेजारी लांडगे बसले होते!"