Sachin Fulpagare
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबईत वरळीमधील NSCI Dome येथे दुपारी 4 वाजता ही महापत्रकार परिषद होणार आहे.
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयवर उद्धव ठाकरे मोठा गौप्यस्फोट करणार आहेत.
शिवसेनेमध्ये 2018 मध्ये झालेल्या अंतर्गत निवडणुकीतले काही व्हिडिओही या महापत्रकार परिषदेत दाखवले जाण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरेंच्या महापत्रकार परिषदेत काय होणार? याची माहिती संजय राऊत यांनी दिली. दरोडे कसे टाकण्यात आले? त्यावर ही महापत्रकार परिषद होणार असल्याचे राऊत म्हणाले.
पत्रकार परिषदेत सत्य मांडण्यात येणार आहे. सत्य ऐका आणि विचार करा, ही आमची भूमिका आहे, असे राऊत म्हणाले.
अशा प्रकारची खुली पत्रकार परिषद घेण्याची हिंमत समोरच्यांनीही दाखवावी. राहुल नार्वेकरांनी, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जनतेसमोर जाण्याची हिंमत दाखवावी, असे आव्हान राऊत यांनी दिले.
तुमचे नेते पंतप्रधान मोदी गेल्या 10 वर्षांत एक पत्रकार परिषद घेऊ शकले नाहीत. जनतेच्या प्रश्नांना उत्तरे दिली नाहीत. आता दिल्लीतील कायदेतज्ज्ञ हे निकालाची पोलखोल करतील, असे राऊत यांनी सांगितले.