Ramraksha Strategy : भाजपला घेरण्यासाठी उद्धव ठाकरेंची 'रामरक्षा' रणनीती काय?

Roshan More

माफ नही करेगा

'अब हिंदू माफ नहीं करेगा'. जे जे देव आणि मंदिरे लुटतायत मग ते भाजपचे असोत वा इतर कोणी त्यांना हिंदू त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ठाकरेंनी दिला.

रामरक्षा आंदोलन

या लुटीविरोधात रविवारी (५ जुलैला) संध्याकाळी ४ वाजता दादर येथील जुन्या कबुतरखान्याजवळील मारुती मंदिरासमोरून होणार 'रामरक्षा' आंदोलन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली.

सामील होण्याचे आवाहन

पक्षभेद विसरून सर्व रामभक्तांना, हिंदूंना आणि ज्यांनी हिंदुत्व धोक्यात आल्यामुळे मोर्चे काढले होते, त्या सर्वांना यात सहभागी होण्याचे आवाहन ठाकरेंनी केले.

'रामरक्षा' आंदोलनाचे स्वरूप

भाजपला जाब विचारण्यासाठी या आंदोलनात सामूहिकरीत्या रामरक्षा, हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालीसा यांचे जाहीर पठण केले जाईल.

राज्यव्यापी मोहिमेची

रविवारी दादरमधून होणारी ही सुरुवात असून, त्यानंतर राज्यभरात जिल्हा पातळीवर, शहरात आणि खेड्यापाड्यात जिथे जिथे राम किंवा हनुमान मंदिरे आहेत, तिथे हे आंदोलन केले जाणार आहे.

वारकऱ्यांना आवाहन

आषाढी वारी सुरू होत असल्याने, राम मंदिराच्या लुटीविरोधात मनात राग असणाऱ्या वारकऱ्यांनीही यात एकत्र यावे आणि भाजपला याचे उत्तरदायित्व स्वीकारायला लावावे, असे आवाहन ठाकरेंनी केले आहे.

लूट सहन करणार नाही

हिंदुत्वाच्या नावाखाली होत असलेली ही लूट सहन केली जाणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला.

130th Amendment : ...तर पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनाही राजीनामा द्यावा लागणार, मोदी सरकार नवे विधेयक मांडणार!

PM Narendra Modi | Sarkarnama
येथे क्लिक करा