Sushma Andhare : शिंदे असो वा फडणवीस...थेट भिडणाऱ्या ठाकरेंच्या फायरब्रँड नेत्या सुषमा अंधारे

Deepak Kulkarni

उद्धव ठाकरेंची ढाल

शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरेंची ढाल बनलेल्या आणि आपल्या वक्तृत्व शैलीमुळे राज्यभरात सध्या चर्चेतलं नाव म्हणजे सुषमा अंधारे हे होय.

Sushma Andhare | Sarkarnama

शिवसेनेच्या उपनेत्या

सुषमा अंधारे या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत. त्यांनी 28 जुलै 2022 रोजी शिवसेनेत प्रवेश केला होता.

Sushma Andhare | Sarkarnama

लातूर जिल्ह्यातला जन्म...

अंधारे या मूळच्या लातूर जिल्ह्यातील मुरूडच्या असून त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1984 रोजी झाला.

Sushma Andhare | Sarkarnama

विश्वासू अन् फायर ब्रँड नेत्या

शिवसेनेत प्रवेश केल्यावर उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू अन् फायर ब्रँड नेत्या म्हणून त्या ओळखल्या जातात.

Sushma Andhare | Sarkarnama

शासकीय नोकरीचा राजीनामा

सुषमा अंधारे या फुले आंबेडकरी चळवळीच्या प्रसारासाठी त्यांनी शासकीय नोकरीचा राजीनामा दिला होता.

Sushma Andhare | Sarkarnama

Sushma Andhare 'असा' भागवला शिक्षणाचा खर्च

उच्च शिक्षण घेत असताना राज्य पातळीवरील अनेक प्रतिष्ठित वक्तृत्व स्पर्धा त्यांनी जिंकल्या असून त्यातून मिळणाऱ्या बक्षिसांमधून शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत झाली असंही त्या सांगतात.

Sushma Andhare | Sarkarnama

दसरा मेळाव्यात भाषण देण्याची संधी

पहिल्याच दसरा मेळाव्यात भाषण देण्याची संधी त्यांना मिळाली. या संधींचं सोनं करत त्या राज्यात चर्चेत आल्या.

Sushma Andhare | Sarkarnama

शिवसेना प्रवेशाआधी हे काम...

शिवसेना प्रवेशाआधी गणराज्य संघात काम करत होत्या. राज्यघटनेत नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांची जाणीव खेड्यापाड्यातील लोकांना व्हावी यासाठी त्या काम करत होत्या.

Sushma Andhare | Sarkarnama

शिवसेना प्रवेश चर्चेचा विषय...

सुषमा अंधारे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. सध्या त्या पुण्यातील 'हिट अँड रन केस' प्रकरणात आमदार रवींद्र धंगेकरांच्या जोडीला मैदानात उतरल्या आहेत.

Sushma Andhare | Sarkarnama

NEXT : प्राणघातक हल्ला, दरोडा प्रकरणात दोषी आढळले आझम खान!