Aslam Shanedivan
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असून महाविकास आघाडीचे सरकार जाऊन तीन वर्षांचा काळ लोटला आहे.
तर उद्धव ठाकरे आता माजी मुख्यमंत्री झाले असून एकनाथ शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले आहेत.
मात्र याचा विसर महावितरण कंपनी पडला असून वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचा फोटो न छापता मविआच्या मुख्यमंत्र्यांचा छापला आहे.
जळगावात महावितरणकडून देण्यात आलेल्या बिलांवर उद्धव ठाकरे यांचा फोटो छापण्यात आला आहे. यामुळे खळबळ उडाली असून आता चौकशी सुरु आहे.
याचे प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रविंद्र चव्हाण यांनी चौकशी सुरु आहे.
चव्हाण यांनी, चुकून असे झाले असेल तर ठिक. पण याच काही चूक आढळल्यास कारवाई करू असा इशारा दिला आहे
चव्हाण सध्या भाजपच्या देश राज्यव्यापी अभियानातर्फे प्राथमिक सदस्यता नोंदणी अभियानात व्यस्त आहेत.