Uganda army chief controversy : तुर्कीकडे एक अब्ज डॉलर अन् सुंदर तरुणीची मागणी; युगांडा लष्कर प्रमुख जनरल मुहूजी केनेरुगाबा कोण आहेत?

Pradeep Pendhare

युगांडा लष्कर प्रमुख

युगांडा लष्कर प्रमुख जनरल मुहूजी केनेरुगाबा यांनी तुर्कीकडे वेगळीच मागणी केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.

Muhoozi Kainerugaba | Sarkarnama

लग्नासाठी तरुणीची मागणी

तुर्कीकडे 1 अब्ज डॉलर्स आणि लग्नासाठी देशातील सर्वात सुंदर तरुणीची अजब मागणी करत, ती पूर्ण न झाल्यास दूतावास बंद करण्याची धमकी दिली आहे.

Muhoozi Kainerugaba | Sarkarnama

अध्यक्षपदाचे वारसदार

युगांडाचे लष्कर प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे पुत्र जनरल मुहूजी केनेरुगाबा हे युगांडा पीपल्स डिफेन्स फोर्सचे विद्यमान संरक्षण दल प्रमुख आहेत. अध्यक्षपदाचे वारसदार मानले जाते.

Muhoozi Kainerugaba | Sarkarnama

सोशलवर सक्रिय

मुहूजी केनेरुगाबा हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी आणि सोशल मीडियावरील सक्रियतेसाठी ओळखले जातात.

Muhoozi Kainerugaba | Sarkarnama

अध्यक्षपदाची महत्त्वाकांक्षा

मुहूजी केनेरुगाबा हे 'पॅट्रिऑटिक लीग ऑफ युगांडा' नावाच्या दबाब गटाचे अध्यक्ष असून, जो गट त्यांच्या अध्यक्षपदाच्या महत्त्वाकांक्षेसाठी काम करतो.

Muhoozi Kainerugaba | Sarkarnama

जन्म ते लग्न

मुहूजी कैनेरुगाबा यांचा जन्म 24 एप्रिल 1974 रोजी टांझानियातील दार इथला असून, 1999 मध्ये शार्लोट नानकुंडा कुटेसा यांच्याशी लग्न केले, त्यांना कैनेरूगाबा कीथ शयन नावाचा मुलगा आहे.

Muhoozi Kainerugaba | Sarkarnama

राज्यशास्त्राची पदवी

मुहूजी यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून 1997 मध्ये राज्यशास्त्राची पदवी मिळवली असून ते युगांडाच्या अँग्लिकन चर्चचे सदस्य आहेत.

Muhoozi Kainerugaba | Sarkarnama

वाद अन् उचलबांगडी

मार्च 2022 मध्ये, राजनैतिक संबंधांना हानी पोहोचवणाऱ्या ट्विट्स, केनियावर आक्रमण अन् नैरोबी 'ताब्यात' घेण्याच्या धमक्या, युक्रेनवरील वादग्रस्त रशियन आक्रमणाचे समर्थनामुळे मुहूजी यांना लष्करी पदावरून काढून टाकले.

Muhoozi Kainerugaba | Sarkarnama

पुन्हा सैन्यात दाखल

21 मार्च 2024 रोजी, मुहूजीला त्यांच्या वडिलांनी UPDFचा प्रमुख म्हणून नियुक्त केल्यानंतर सैन्यात परत पाठवण्यात आले.

Muhoozi Kainerugaba | Sarkarnama

NEXT : अमेरिकेत स्वामी विवेकानंदांचा भव्य पुतळा उभारला

येथे क्लिक करा :