Aadhar Card New Rule : आधार अपडेट करायचं! आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे, काय आहे नवी अट?

Rashmi Mane

आधार कार्ड अपडेट

जर तुम्ही तुमच्या आधार कार्डमध्ये नाव, पत्ता किंवा फोटोसारखी माहिती दुरुस्त करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

Aadhar Card | Sarkarnama

नवे नियम लागू

UIDAI ने आधार अपडेटसंदर्भात नवे नियम लागू करण्याची घोषणा केली आहे. हे नियम आजपासून म्हणजे 1 ऑक्टोबर 2025 पासून अमलात येणार आहे. यानंतर आधारमधील बदलांसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Aadhar Card | Sarkarnama

शुल्कात वाढ

UIDAI च्या नव्या नियमानुसार, आधार कार्डमधील सामान्य सुधारणा म्हणजेच नाव, पत्ता बदलण्यासाठी 75 रुपये शुल्क आकारले जाईल. तर..

Aadhar Card | Sarkarnama

अधिक पैसे द्यावे लागणार

तर फोटो, बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट) आणि डोळ्यांची (आयरिस) माहिती दुरुस्त करण्यासाठी 125 रुपये द्यावे लागतील.

Aadhar Card | Sarkarnama

10 वर्षांनंतर अनिवार्य अपडेट

1 ऑक्टोबर 2025 पासून 10 वर्षांहून जुना आधार अपडेट करणे अनिवार्य होईल. म्हणजे जर तुम्ही गेल्या दहा वर्षांत तुमच्या आधार कार्डमध्ये कोणताही बदल केलेला नसेल, तर आता तुम्हाला पुन्हा कागदपत्रे सादर करून शुल्क भरावे लागणार आहे. या निर्णयामुळे ग्रामीण आणि लहान शहरांतील लोकांना अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो.

Aadhar Card | sarkarnama

मुलांना दिलासा

UIDAI ने काही वयोगटातील मुलांना दिलासा दिला आहे. 5 ते 7 वर्षे आणि 15 ते 17 वर्षे वयोगटातील मुलांचे बायोमेट्रिक अपडेट मोफत करण्यात आले आहे. याआधी या अपडेटसाठी 50 रुपये शुल्क आकारले जात होते.

Aadhar Card | Srkarnama

आधार कार्ड अमान्य

मात्र, हे अपडेट करणे अनिवार्य राहणार आहे. वेळेत अपडेट न केल्यास संबंधित मुलांचे आधार कार्ड अमान्य ठरू शकते.

Aadhar Card | Sarkarnama

Next : 1 ऑक्टोबरपासून नवे रेल्वे नियम लागू; प्रवाशांना मिळणार थेट फायदा

येथे क्लिक करा