Aslam Shanedivan
सध्या देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात स्वत:ची ओळख सांगण्यासाठी आधार कार्ड महत्वाचा मानला जाते
आधार कार्ड लिंक केल्यानंतरच शासनाच्या अनेक योजना थेट दिल्या जात आहेत.
पण याचा गैरवापर होण्याची ही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे यात बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
याप्रमाणे युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने नवीन आधार कार्ड निर्माण करायचा निर्णय घेतला आहे.
या नव्या आधार कार्डवर फक्त फोटो आणि QR कोड असेल तर आधार कार्डवरील नाव, पत्ता आणि आधार कार्ड क्रमांक काढून टाकले जाईल.
तर हे नवे असणारे आधार कार्ड हॉटेल, विमानतळ, सुविधा संस्थांसारख्या संस्थांकडून ऑफलाइन पडताळणीला मदत करणारे असून ते डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता आहे.
भारतात आधार पडताळणी धारकाच्या संमतीशिवाय करता येत नाही आणि असे करणाऱ्या कोणत्याही संस्थेला ₹1 कोटी पर्यंत दंड होऊ शकतो.