Rashmi Mane
UIDAI लवकरच एक नवं QR कोड आधारित अॅप लाँच करणार आहे! हे अॅप तुमचं आधार कार्ड अपडेट करणे आणि शेअर करणे खूपच सोपं करेल.
या अॅपमुळे तुम्हाला पत्ता, बायोमेट्रिक, मोबाईल नंबर किंवा इतर माहिती अपडेट करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज पडणार नाही.
हे अॅप तुमच्या सबमिट केलेल्या कागदपत्रांमधून (जसे की पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स) वैयक्तिक माहिती घेईल आणि अपडेट करेल.
या डिजिटल प्रोसेसमुळे फसवणुकीचा धोका कमी होईल आणि अपडेट्स अधिक पारदर्शक पद्धतीने होतील.
आता तुम्हाला सरकारी/खाजगी कामांसाठी आधारची फोटोकॉपी द्यायची गरज नाही. अॅपमधूनच इलेक्ट्रॉनिक आधार शेअर करता येणार!
नाव – 2 वेळा
पत्ता – अमर्याद
जन्मतारीख – फक्त 1 वेळ
मोबाईल नंबर – कितीही वेळा
UIDAI ने 2025 मध्ये आधार अपडेटसाठी कोणतेही शुल्क लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे!
QR कोड तंत्रज्ञानामुळे डेटा अधिक सुरक्षित राहणार. तुमची माहिती योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीपर्यंतच पोहोचेल.