UIDAI Bharti 2026 : मोठी बातमी! UIDAI मध्ये 252 जागांसाठी भरती; पगार आणि पात्रता जाणून घ्या एका क्लिकवर

Rashmi Mane

मोठी संधी तुमच्यासाठी!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी. आधार सेवेत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. डिजिटल इंडियाच्या उपक्रमांतर्गत ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

Aadhar Card | Sarkarnama

कोण करत आहे भरती?

Unique Identification Authority of India (UIDAI) अंतर्गत काम करणाऱ्या CSC e-Governance Services India Limited मार्फत आधार सुपरवायझर आणि ऑपरेटर पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

किती जागा उपलब्ध?

या भरती मोहिमेत एकूण 252 पदे भरली जाणार आहेत. राज्यातच राहून काम करण्याची संधी असल्याने अनेक तरुणांसाठी ही उत्तम संधी ठरणार आहे.

नोकरीचा कालावधी

ही भरती 1 वर्षांच्या कंत्राटी तत्त्वावर केली जाणार आहे. पण जर कामगिरी समाधानकारक असल्यास पुढे संधी वाढू शकते.

Aadhar Card | Sarkarnama

अर्ज करण्याची शेवटची तारीख

इच्छुक उमेदवारांनी 10 मार्च 2026 पूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Aadhar Card | Sarkarnama

शैक्षणिक पात्रता काय?

अर्जदार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा. तसेच 2 वर्षांचा ITI कोर्स पूर्ण केलेले उमेदवारही या भरतीसाठी पात्र आहेत. 10वी नंतर 3 वर्षांचा पॉलिटेक्निक डिप्लोमा केलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.

Aadhaar card Update | Sarkarnama

अर्ज कसा करावा?

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज भरायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला csc.gov.in वर जायचे आहे.

Sarkarnama

अर्ज करताना लागणारी माहिती

यानंतर तिथे तुम्हाला ASK Job Opening वर जायचे आहे. यानंतर आधार सुपरवायजर पदावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला तुमचे राज्य निवडायचे आहे. मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि पॅन कार्ड क्रमांक अशी आवश्यक माहिती भरावी लागेल. सर्व तपशील अचूक भरल्याची खात्री करा.

Sarkarnama

Next : अशक्य काहीच नाही! 12वीत नापास, सायकलवरून दूधविक्री; पण जिद्दीच्या जोरावर थेट खाकी वर्दी! वाचा IPS ऑफिसरचा थक्क करणारा प्रवास... 

येथे क्लिक करा