Maharashtra Politics : पुतण्यांनी सोडला काकांचा हात; कुणी काढला पक्ष, कुणी पळवली पार्टी

Roshan More

अजित पवार

महाराष्ट्राच्या राजकारणात काका-पुतण्यांचा वाद नवा नाही. राजकीय महत्त्वकांक्षेसाठी ज्या काकांनी राजकारणात आणले त्यांचीच साथ सोडून पुतण्यांची राजकारण सुरू केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अजित पवार यांनी जून 2023 मध्ये काका शरद पवार यांची साथ सोडली.

Ajit pawar | sarkarnama

राज ठाकरे

काका बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम करणारे राज ठाकरे 2005 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडले. 2006 मध्ये त्यांनी स्वतःचा महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष स्थापन केला.

Raj Thackeray | sarkarnama

धनंजय मुंडे

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे यांनी 2013 मध्ये गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. (Maharashtra Politics )

Dhananjay Munde | sarkarnama

संदीप क्षीरसागर

जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे संदीप क्षीरसागर आपले काका जयदत्त हे शिवसेनेत असताना त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवत विजय मिळवला होता.

sandeep kshirsagar | sarkarnama

अवधूत तटकरे

आदिती तटकरे राजकारणात आल्यानंतर अवधूत यांनी काका सुनिल तटकरेंची साथ सोडत शिवसेना आणि नंतर भाजपमध्ये जाणे पसंत केले.

Avdhoot Tatkare

आशिष देशमुख

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात त्यांचे पुतणे आशिष देशमुख यांनी निवडणूक लढत विजय मिळवला होता.काका पुतण्यात सुरू असलेला संघर्ष आजही सुरू आहे.

Ashish Deshmukh

योगेश क्षीरसागर

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे दुसरे पुतणे डॉ. योगेश क्षीरसागर यांनी देखील जयदत्त क्षीरसागर यांची साथ सोडत अजित पवार गटात प्रवेश केला आहे.

Yogesh Kshirsagar | sarkarnama

NEXT : सलग 8 निवडणुकीत 'विजय' अन् संगमनेरच्या राजकारणातला 'किंग'

Balasaheb Thorat | sarkarnama