Chhota Rajan : ...अन् अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला पुन्हा न्यायालयाने सुनावली जन्मठेप!

Mayur Ratnaparkhe

मुंबईतील एका विशेष न्यायालयाने छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

2001मध्ये हॉटेल व्यावसायिक जय शेट्टीच्या हत्येच्या गुन्ह्यात गँगस्टर छोटा राजनला गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (MCOCA) अंतर्गत छोटा राजनला दोषी ठरवलं गेलं

छोटा राजनला जन्मठेपेच्या शिक्षेसोबतच 16 लाख रुपयांचा दंड देखील ठोठवला आहे. 

महाराष्ट्र सरकारच्या नोटिफिकेशननंतर छोटा राजनच्या सर्व 71 प्रकरणांचा तपास सीबीआय़ला सोपवला आहे. 

 छोटा राजनच्या तीन अन्य प्रकरणांचा तपासही सीबीआयने केला, ज्यामध्ये तो दोषी आढळलेला आहे. 

याप्रकरणांमध्ये त्याला दहा वर्षे, आठ वर्षे आणि दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली आहे.


NEXT : अन्सार शेख, टीना डाबी यांच्यानंतर येवल्याच्या प्रियंका मोहितेंचा रेकॉर्ड