Amanat Bansal Marriage : केंद्रीय मंत्र्यांच्या घरी येणार 'अमानत'; सुनेचे ऑक्सफर्डमध्ये शिक्षण, वडील कोट्याधीश...

Rajanand More

कार्तिकेय-अमानत यांचा विवाह

केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचा मोठा मुलगा कार्तिकेय लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. अमानत बन्सल हिच्यासोबत कार्तिकेयचा विवाह होणार आहे. 

Kartikey Singh Chouhan, Amanat Bansal | Sarkarnama

Amanat Bansal Familyकोण आहे अमानत?

अमानत ही मुळची राजस्थानची असून कार्तिकेयसोबत अनेक दिवसांपासूनची ओळख आहे. दोघांचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडाही झाला आहे.

Amanat Bansal | Sarkarnama

वडील उद्योगपती

अमानतचे वडील अनुपम बन्सल हे उद्योगपती आहेत. लिबर्टी शू या कंपनीचे ते कार्यकारी संचालक आहेत. तर आई रुचिता या कॉन्फडरेशन ऑफ वुमन आंत्रप्य्रुनर्स ऑफ इंडिया ही संस्था चालवतात.

Amanat Bansal Family | Sarkarnama

दुसऱ्या क्रमांकाची कंपनी

लिबर्टी ही कंपनी १९५४ मध्ये स्थापन झाली होती. आज या कंपनीची २५ देशांमध्ये उत्पादने पोहचत आहेत. कंपनीची उलाढाल सुमारे ६०० कोटींची आहे.

Amanat Bansal | Sarkarnama

ऑक्सफर्डमध्ये शिक्षण

अमानतने लंडनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतले आहे. मानसशास्त्र विषयात तिने ही पदवी मिळवली आहे.

Amanat Bansal | Sarkarnama

शिकत असताना ओळख

शिक्षण घेत असतानाच कार्तिकेय आणि अमानत या दोघांची ओळख झाली. अनेक दिवसांपासून त्यांच्या विवाहाची चर्चा होती.

Amanat Bansal | Sarkarnama

शास्त्रीय नृत्यांगना

अमानत ही शास्त्रीय नृत्यामध्येही पारंगत आहे. तिने दिल्लीत भरतनाट्यमचे सादरीकरण मोठ्या व्यासपीठावरही केले आहे.

Amanat Bansal | Sarkarnama

कार्तिकेयचे शिक्षण

कार्तिकेय याने पुण्यातील सिम्बायोसिस विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. तसेच अमेरिकेत एलएलएमची पदवी मिळवली आहे.  

Kartikey Singh Chouhan, Amanat Bansal | Sarkarnama

NEXT : धडधडणाऱ्या हृदयाचं 35 मिनिटांचं 'एअरलिफ्ट' मिशन; मराठमोळ्या IPS अधिकाऱ्याची जबरदस्त स्टोरी

येथे क्लिक करा.