Rajanand More
केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मोठा मुलगा कार्तिकेय लवकरच विवाह बंधनात अडकणार आहे. त्याच्या विवाहाच्या धार्मिक विधींना बुधवारपासून (ता. 26) सुरूवात झाली.
कार्तिकेय हे राजकारणात सक्रीय असून वडिलांप्रमाणे आक्रमक आहेत. विधानसभेसह लोकसभा निवडणुकीतही त्यांनी प्रचार केला होता. शिवराज यांचे उत्तराधिकारी म्हणून पाहिले जात आहे.
कार्तिकेय यांचा अमानत बन्सल यांच्यासोबत विवाह होणार आहे. त्यांचा साखरपुडा झाला आहे. नुकतेच त्यांनी काशी येथे प्री-वेडिंग शुट केले.
कार्तिकेय यांचे सासरे अनुपम राजस्थानमध्ये उद्योजक आहेत. त्यांची लिबर्टी नावाची शूजची कंपनी आहे. या कंपनीचे ते कार्यकारी संचालक आहेत.
कार्तिकेयची भावी पत्नी अमानत हिने नुकतीच लंडनमध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम.एस्सीचे शिक्षण पूर्ण केले आहे.
अमानत वयाच्या सहाव्या वर्षापासून भरतनाट्यम शिकत होती. तिने 15 व्या वर्षी दिल्लीत भरतनाट्यम अरंगेत्रमचे पहिल्यांदा मोठ्या व्यासपीठावर सादरीकरण केले होते.
कार्तिकेय आणि अमानत यांच्या विवाहपूर्व धार्मिक विधींना बुधवारपासून (ता. 26) सुरूवात झाली. शिवराज सिंह चौहान यांनीच सोशल मीडियात याबाबतचे फोटो शेअर केले आहेत.
शिवराज सिंह चौहान यांना दोन पुत्र असून लहान मुलगा कुणाल याचा काही दिवसांपूर्वीच विवाह झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही कुणालसह कार्तिकेयच्या विवाहाचे निमंत्रण देण्यात आले होते.