Rajanand More
राजनाथ सिंह यांच्या विभागासाठी 6 लाख 21 हजार 940 कोटींची सर्वाधिक तरतूद करण्यात आली आहे.
नितीन गडकरी यांच्याकडील मंत्रालय दुसऱ्या स्थानावर आहे. विभागासाठी 2 लाख 78 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
रेल्वेसाठी सीतारमण यांनी 2 लाख 55 हजार 393 कोटी रुपये दिले आहेत. अश्विनी वैष्णव यांचे हे मंत्रालय तिसऱ्या क्रमांकावर आहे.
विभागाला 2 लाख 23 हजार 323 कोटी रुपये देण्यात येणार आहे. प्रल्हाद जोशी या विभागाचे मंत्री आहेत.
अमित शाह यांच्या गृह विभागासाठी 2 लाख 19 हजार 643 कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे.
ज्योतिरादित्य शिंदे यांच्या या विभागासाठी 1 लाख 37 हजार 293 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांचे लक्ष लागलेल्या कृषी विभागाला सीतारमण यांनी 1 लाख 32 हजार 469 कोटी दिले आहेत. शिवराज सिंह चौहान या खात्याचे मंत्री आहेत.
नीटच्या मुद्यावर वादात सापडलेले धर्मेंद्र प्रधान यांच्या खात्याला 1 लाख 20 हजार 627 कोटी दिले आहेत.
जेपी नड्डा मंत्री असलेल्या या विभागासाठी 90 हजार 958 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.