Jagdish Patil
अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी 2025 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
तर बजेट तयार करताना किती सुरक्षा घेतली जाते आणि तो तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर किती निर्बंध असतात ते जाणून घेऊया
अर्थसंकल्पाचं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तो संसदेत सादर होईपर्यंत कुटुंबियांशी फोनवर बोलण्याचीही परवानगी नसते.
मात्र, अत्यंत वरिष्ठ आणि अर्थमंत्र्यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांना घरी जाण्याची परवानगी असते.
अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या मंत्रालयाच्या कार्यालयात बाहेरील व्यक्तींसह मिडियाला पूर्णपणे प्रवेश बंदी असते.
अर्थसंकल्प अत्यंत गोपनीय असल्यामुळे तो सादर होण्याआधी 10 दिवस अधिकार्यांना कामाशी संबंधित नसलेल्याशी संपर्क करता येत नाही.
या काळात एखादा अधिकारी आजारी पडला तरी त्याला रुग्णालयात नेण्याची परवानगी नसते. यासाठी डॉक्टरांची टीम नॉर्थ ब्लॉकमध्येच तैनात केली जाते.
अर्थसंकल्प संसदेत सादर होण्याआधी अर्थ मंत्रालयाच्या तळघरात असलेल्या प्रिंटिंग प्रेसमध्ये त्याची छपाई केली जाते.
ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टनुसार, अर्थसंकल्प सादर होईपर्यंत एक प्रकारचे गुप्त दस्तऐवज असते. त्यामुळे तो लोकांपासून लपवून ठेवला जातो.