Union Cabinet Reshuffle : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात निवृत्त अधिकाऱ्यांची एंट्री? 'या' नावांची चर्चा, महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता

Aslam Shanedivan

केंद्रीय मंत्रिमंडळ

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा होताना दिसत असून काही नवीन चेहर्‍यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.

Union Cabinet Reshuffle | sarkarnama

निवृत्त अधिकाऱ्यांना

तर या चर्चेत अनुभवी निवृत्त अधिकार्‍यांना देखील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.

Union Cabinet Reshuffle | sarkarnama

काय फायदा

निवृत्त अधिकाऱ्यांना देशाच्या विविध भागात आणि महत्त्वाच्या पदांवर काम करण्याचा अनुभव असल्याने गुंतागुंतीच्या धोरणांची सखोल समज त्यांच्यात असते.

Union Cabinet Reshuffle | sarkarnama

मोदी सरकार

यामुळे अनुभव, निष्ठा आणि प्रभावी कामगिरी करणाऱ्या निवृत्त अधिकाऱ्यांवर मोदी सरकारने नजर ठेवलेली आहे.

Union Cabinet Reshuffle | sarkarnama

नाव सर्वाधिक चर्चेत

या चर्चेत दोन अनुभवी निवृत्त अधिकार्‍यांचे नाव सर्वाधिक चर्चेत असून या अधिकाऱ्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

Union Cabinet Reshuffle | sarkarnama

शक्तिकांत दास

यात शक्तिकांत दास यांचे नाव चर्चेत आहे. शक्तिकांत दास हे RBI चे माजी गव्हर्नर आहेत.

Union Cabinet Reshuffle | sarkarnama

तपन डेका

वरिष्ठ अधिकारी तपन डेका यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. आयपीएस तपन डेका आयबी प्रमुख म्हणून नुकताच (१० जून रोजी) सेवानिवृत्त झाले आहेत.

Union Cabinet Reshuffle | sarkarnama

एस जयशंकर

यापूर्वी देखील सरकारांनीही अशा प्रकारचे प्रयोग केले असून भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर हे देखील वरिष्ठ अधिकारी राहिले आहेत.

Union Cabinet Reshuffle | sarkarnama

EPFO चा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय! PF चे पैसे 3 दिवसांत खात्यात जमा होणार; ऑटो सेटलमेंट फ्रेमवर्क नेमकं काय आहे?

आणखी पाहा