Rashmi Mane
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज म्हणजेच 17 जून रोजी महाराष्ट्राचे प्रभारी आणि सहप्रभारी यांची घोषणा केली.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची प्रभारी आणि अश्वनी वैष्णव यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यार्थी दशेपासून राजकारण सक्रिय असलेल्या यादवांनी केंद्रीय मंत्री पदापर्यंतचा प्रवास केलेला आहे.
भूपेंद्र यादव वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दाखल झाले.
भूपेंद्र यादव हे मूळचे गुरुग्राम जिल्ह्यातील जमालपूर गावचे रहिवासी आहेत. राजस्थानमधून ते दोनदा राज्यसभेत निवडून गेले आहेत.
भूपेंद्र यादव यांचे शालेय ते महाविद्यालयीन शिक्षण राजस्थानमध्येच झाले.
भूपेंद्र शाळेत शिकत असताना संघाशी जोडले गेले. संघाच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. महाविद्यालयात आल्यानंतर विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले.
कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते हळूहळू भाजपच्या राजकारणात सक्रिय होऊ लागले. अनेक वर्षे वकीली केल्यानंतर भाजपशी पूर्णवेळ जोडले गेले.