Rajanand More
दिवंगत माधवराव शिंदे यांच्या पत्नी व केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या आई. 1966 मध्ये शिंदे परिवारात आल्या.
आजोबा नेपाळचे माजी पंतप्रधान असून त्यांना प्रिंसेस किरण राज्यलक्ष्मी देवी म्हणूनही ओळखले जाते.
ग्वाल्हेर येथील शिंदे राजघराण्यातील माधवराव शिंदे यांच्याशी 1966 मध्ये मराठी परंपरेनुसार विवाह झाला.
2001 मध्ये माधवराव शिंदे यांचा एका विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यावेळी ते केवळ 56 वर्षांचे होते.
मागील तीन महिन्यांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
70 वर्षीय माधवी राजे यांची तब्येत बिघडली असून त्या गंभीर आहेत. त्यांच्या फुफ्फुसामध्ये संसर्ग झाला आहे.
ज्योतिरादित्य शिंदे हे गुना लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आहेत. प्रचार अर्धवट सोडून ते दिल्लीला रवाना झाल्याचे समजते.
फेब्रुवारी महिन्यात माधवी राजे काही दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. तसेच 2020 मध्ये कोरोना काळातही त्यांना संसर्ग झाला होता.