Vijaykumar Dudhale
सोलापूर जिल्ह्यातील कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील रे नगरमध्ये दोनशे एकर जागेवर असंघटित कामगारांसाठी घरे बांधण्यात आली आहेत. या प्रकल्पासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी तब्बल 14 वर्षे मेहनत घेतली आहे. त्याचे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उदघाटन होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 9 जानेवारी 2019 रोजी या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. त्या वेळी मोदींनी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी पुन्हा मीच येईन, असे म्हटले होते. त्याच्या उद्घाटनासाठी मोदी उद्या सोलापुरात येत आहेत.
रे नगरमध्ये तब्बल 30 हजार घरे बांधण्याचा हा प्रकल्प आहे. त्यातील 15 हजार घरे बांधून पूर्ण झाली आहेत. या पंधरा हजार घरांसाठी तब्बल दोन हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे.
एका कामगाराला 300 चौरस फुटाचे वन बीएचके घर मिळणार आहे. या वसाहतीमध्ये अडीचशे कोटींच्या रस्ते,पाणी आणि ड्रेनेज या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत.
रे नगरमध्ये 500 लोकांना प्रशिक्षण देणारे कौशल्य विकास केंद्रही उभारण्यात आले आहे.
कौशल्य विकास केंद्राशिवाय 40 अंगणवाड्या आणि सीटीपी, डब्ल्यूटीपी प्रकल्प असणार आहेत.
योगा केंद्र आणि मुलांसाठी अत्याधुनिक खेळण्यांसह बगीचाही उभारण्यात आलेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रे नगरमध्ये पंधरा कोटींच्या सहा प्राथमिक शाळांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे.
'आता मोठ्या माशांची वेळ येणार'