सरकारनामा ब्युरो
उत्तर प्रदेश मध्ये कुंभमेळाच्या पार्श्वभूभीवर युपीचे उपमुख्यमंत्री योगी अदित्यानाथ यांनी IPS आणि IAS यांची बदलीचे सत्र सुरु केले आहे.
यूपी कॅडरचे आयपीएस अधिकारी अखिलेश कुमार यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) मध्ये DIG म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या आर्थिक गुन्हे शाखा Economic Offences Wing (EOW) मध्ये महानिरीक्षक Inspector General (IG) म्हणून कार्यरत असलेले कुमार हे पोलीस शाखेमधील धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळखले जातात.
भरतपुरयेथील मूळ रहिवासी असलेले अखिलेश कुमार हे 2005 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.
त्यांनी बी.टेकमध्ये पदवी घेतली आहे.
कुमार यांनी त्यांच्या प्रभावी कारकिर्दीत आझमगडमध्ये डीआयजी आणि आयजी म्हणून कामकाज पाहिले. नोएडा आणि वाराणसी या ठिकाणी त्यांनी पोलिस सहआयुक्त पदावरील महत्त्वाची जबाबदारी पार पाडली.
उच्च-प्रोफाइल असाइनमेंट आणि अनेक अवघड केसेस हाताळण्याच्या त्यांच्या अनुभवामुळे त्यांना DIG पदाची जबाबदारी देण्य़ात आली आहे.
CISF मधील त्यांची नियुक्ती ही त्यांच्या गौरवशाली कारकिर्दीतील एक उत्तम उदाहरण मानलं जातं. जी विविध कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सींमधील महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्यापैकी एक आहे.