सरकारनामा ब्यूरो
सुकिर्ती माधव मिश्रा हे उत्तरप्रदेशातील कर्तबगार आणि गुन्हेगारीवर आळा घालणारे अधिकारी आहेत.
शामलीमध्ये त्यांच्या भीतीने गुंडांनी पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले आणि गुन्ह्यापासून दूर राहण्याची शपथ घेतली.
गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण केल्यामुळे एसपी मिश्रा हे शामलीचे लोकप्रिय अधिकारी आहेत.
बिहारमधील जमुई जिल्ह्यातील मलयपूर या गावात राहणारे मिश्रा हे 2015 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत.
आयुष्य संघर्षात गेलेले मिश्रा हे सध्या यूपीच्या शामली जिल्ह्याचे SP आहेत.
वडील हायस्कूलमध्ये शिक्षक आणि आई गृहिणी आहेत, म्हणून त्यांनी सरकारी शाळेतूनच शिक्षण पूर्ण केले.
वडिलांनी सांगितले की, आयपीएस अधिकारी होऊन समाजाची सेवा कर, त्यावेळी त्यांनी अधिकारी व्हायचे ठरवले.
कोल इंडियामध्ये व्यवस्थापक म्हणून नोकरी करत असताना त्यांनी यूपीएससीची तयारी करण्यास सुरूवात केली.
2015 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस केडर मिळाले आणि मिश्रा यांनी १५ लाख रुपयांची नोकरी सोडत पोलिस सेवेत रुजू झाले.