Rashmi Mane
तुमचं पेमेंट अडकलंय का? UPI डाऊन आहे? मग हे पर्याय वापरून लगेच पैसे पाठवा.
खरं तर भारतात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजेच UPI व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या कोट्यवधींमध्ये आहे.
यूपीआय प्रणाली इतकी विश्वासार्ह बनली आहे की अनेक लोकांनी रोख रक्कम ठेवणे बंद केले आहे.
गेल्या काही दिवसांत देशात UPI सेवा 3 वेळा बंद पडली आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.
पण जेव्हा UPI सेवा बंद असते तेव्हा वापरकर्त्यांना पेमेंट कसे करावे हे समजत नाही.
सर्वात सोपा पर्याय म्हणजे बँकेच्या वेबसाइट किंवा अॅपवरून थेट पैसे ट्रान्सफर करा.
तसेच दुसरा पर्याय म्हणजे डेबिट/क्रेडिट कार्ड तुमच्याकडे कार्ड असल्यास, कोणत्याही POS मशीनवरून सहज पेमेंट करता येऊ शकते.
UPI बंद असताना हे पारंपरिक पर्याय अजूनही खात्रीशीर आहेत.