UPI Payment Update : ‘पिन विसरला तरी चालेल!’ UPI घेऊन आलंय नवीन अपडेट; काय आहे नवीन बदल?

Rashmi Mane

नवं फीचर

देशात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढत असताना आता त्यात NPCI आणि RBI यांनी एक नवं फीचर आणलं आहे.

UPI payment New Update | Sarkarnama

UPI ट्रान्झॅक्शन

आता PIN न टाकता फक्त फिंगरप्रिंट किंवा फेस आयडीने UPI पेमेंट करता येणार!आतापर्यंत UPI ट्रान्झॅक्शन करताना प्रत्येकवेळी PIN टाकावा लागत होता. पण आता...

UPI payment New Update | Sarkarnama

बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन

वापरकर्ते बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन म्हणजेच अंगठ्याचा ठसा किंवा चेहरा ओळख (Face Unlock) वापरून पेमेंट करू शकतील. एवढंच नाही, तर स्मार्ट ग्लासेसच्या मदतीनेही पेमेंट करणं शक्य होणार आहे

UPI payment New Update | Sarkarnama

पेमेंटसाठी मर्यादा

हे फीचर सुरूवातीला मर्यादित वापरासाठी आणलं गेलं आहे. सध्या 5000 पर्यंतचं पेमेंट बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनने करता येईल. मोठ्या रकमेच्या व्यवहारांसाठी मात्र UPI PIN वापरावा लागेल.

UPI payment New Update | Sarkarnama

नवीन अपडेट

हे फीचर अजून सर्व UPI अॅप्सवर उपलब्ध झालेलं नाही, पण पुढच्या काही दिवसांत बहुतांश हे अपडेट सगळ्यांना मिळणार आहे.

UPI payment New Update | Sarkarnama

हे फीचर वापरायचं कसं?

सर्वात आधी तुमचं UPI अॅप (जसे PhonePe, Google Pay,..) उघडा. तिथे नवीन पेमेंट सुरू कर, QR कोडने स्कॅन करा किंवा कॉन्टॅक्ट निवडा. पेमेंटची रक्कम टाका आणि कोणत्या बँकेतून पैसे पाठवायचे ते निवडा.

UPI payment New Update | Sarkarnama

सेकंदांतच पेमेंट

जेव्हा PIN टाकण्याचा पर्याय दिसेल, तेव्हा त्याऐवजी ‘Use Biometric’ हा पर्याय निवडा. आता तुमचा फिंगरप्रिंट किंवा फेस स्कॅन करा. काही सेकंदांतच कन्फर्मेशन मेसेज येईल आणि पेमेंट पूर्ण होईल.

UPI payment New Update | Sarkarnama

बायोमेट्रिकमुळे फसवणुकीची शक्यता कमी

या नवीन फीचरमुळे UPI पेमेंट आणखी सोपं, जलद आणि सुरक्षित होणार आहे. PIN विसरण्याची झंझट राहणार नाही आणि बायोमेट्रिकमुळे फसवणुकीची शक्यता कमी होईल.

UPI payment New Update | Sarkarnama

डिजिटल व्यवहारांना वेग

NPCI आणि RBI यांचा हा उपक्रम देशात डिजिटल व्यवहारांना नवा वेग देणारा ठरणार आहे. आता लोकांना फक्त मोबाईल हातात घेताच फिंगरप्रिंटने सहज पेमेंट होणार.

UPI payment New Update | Sarkarnama

Next : 'नोबेल'मध्ये डोनाल्ड ट्रम्पना धोबीपछाड : 'आयर्न लेडी'ची कामगिरी वाचून थक्क व्हाल!!

येथे क्लिक करा