Rashmi Mane
15 सप्टेंबर 2025 पासून कर, विमा, लोन EMI अशा व्यवहारांसाठी 10 लाख रुपयांपर्यंत पैसे पाठवता येणार.
UPIची सध्या दिवसाला 1 लाख रुपये पाठवण्याची मर्यादा आहे. पण आता काही विशेष व्यवहारांसाठी ही मर्यादा वाढवण्यात आली आहे.
कर भरणे
विमा प्रीमियम भरणे
कर्जाचे हफ्ते (EMI)
शेअर बाजार / म्युच्युअल फंड गुंतवणूक
क्रेडिट कार्ड बिल पेमेंट
आता UPI द्वारे एका वेळी 5 लाख रुपये आणि 24 तासांत 10 लाख रुपये देता येतील. 15 सप्टेंबर हा कर भरण्याचा डेडलाईन असल्याने हा मोठा बदल फायदेशीर ठरणार.
पूर्वी UPI ची मर्यादा फक्त 2 लाख रुपये होती. आता प्रति व्यवहार 5 लाख रुपये व दिवसाला 10 लाख रुपये करता येणार.
लोन EMI, बिझनेस टू बिझनेस कलेक्शनसाठी प्रति व्यवहार 5 लाख रुपये मर्यादा
दिवसाला 10 लाख रुपये करण्यात आली आहे.
क्रेडिट कार्ड बिलासाठी पूर्वीची 2 लाख रुपयांची मर्यादा वाढवून आता प्रति व्यवहार 5 लाख रुपये आणि दिवसाला 6 लाख रुपये इतकी करण्यात आली आहे.