Rashmi Mane
राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने 15 सप्टेंबर 2025 पासून लागू होणाऱ्या नवीन UPI transaction च्या मर्यादांची माहिती दिली आहे.
यानुसार काही खास कॅटेगरीतील मोठ्या रकमेचे पेमेंट आता एका ट्रान्झॅक्शनमध्ये सहज करता येतील.
या नवीन नियमांनुसार इंश्योरन्स प्रीमियम, कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक, क्रेडिट कार्ड बिल, ट्रॅव्हल बुकिंग, ज्वेलरी खरेदी, सरकारी ई-मार्केटप्लेस (GeM) तसेच डिजिटल खाते सुरू करणे यांसारख्या व्यवहारांसाठी वेगवेगळ्या मर्यादा ठरवण्यात आल्या आहेत.
कॅपिटल मार्केटमध्ये गुंतवणूक किंवा इंश्योरन्स प्रीमियमसाठी एका वेळेस 5 लाखपर्यंत व्यवहार करता येईल, तर 24 तासांत एकूण 10 लाखपर्यंत पेमेंट करता येईल. क्रेडिट कार्ड बिलांसाठी 24 तासांची मर्यादा 6 लाख ठेवण्यात आली आहे.
ज्वेलरी खरेदीसाठी एका ट्रान्झॅक्शनसाठी 5 लाख, तर 24 तासांत 6 लाख करता येतील. व्यवसाय किंवा मर्चंट पेमेंटवर कुठलीही 24 तासांची मर्यादा नाही.
सर्वसाधारण वापरकर्त्यांसाठी P2P (पर्सन-टू-पर्सन) ट्रान्झॅक्शनची मर्यादा बदललेली नाही. ही मर्यादा अजूनही 1 लाख प्रति दिवस राहील. यामुळे PhonePe, Paytm, Google Pay यांसारख्या UPI अॅप्सवर हे नियम थेट लागू होतील.
NPCI च्या म्हणण्यानुसार या बदलांचा उद्देश मोठ्या रकमेच्या व्यवहारांना सोपे आणि सुरक्षित बनवणे हा आहे. यामुळे ग्राहकांना वारंवार छोटे ट्रान्झॅक्शन करावे लागणार नाहीत.